पंतप्रधान कार्यालयाकडून एक फोन अन्… मोदी मंदिरातून मूर्ती हटवली

0 403
पुणे –    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे येथे उभारण्यात आलेला मोदी मंदिर (Modi temple)  हटवण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून (Prime Minister’s Office)  देण्यात आलेल्या आदेशानंतर हा मंदिर हटवण्यात आला आहे.  पुणे शहरात (Pune City) राहणारे एका समर्थकाने पंतप्रधान मोदी यांना  देवाचा दर्जा देत  या मंदिराची उभारणी केली होती मात्र आता ही मंदिर हटवण्यात आला आहे. (A phone call from the Prime Minister’s Office and the idol was removed from the Modi temple)
Related Posts
1 of 1,640

पुणे शहरातील औंध भागातील परिहार चौकात नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी या मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता.

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनर ही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपा चा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केलं होतं.(A phone call from the Prime Minister’s Office and the idol was removed from the Modi temple)

नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर रुग्णालयात दखल

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: