अंगणात आलेल्या कोंबडी सोबत इसमाने केले असे कृत्य की..त्यावर गुन्हा दाखल झाला

0 495

श्रीगोंदा  :-  तालुक्यातील निमगाव खलू येथील एका इसमाने अंगणात आलेल्या शेजारच्या कोंबडी (Chicken) सोबत असे कृत्य केले की, दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन होऊन, नमूद इसमावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निमगाव खलू येथील रहिवासी असलेले नवनाथ कांबळे यांचा उदरनिर्वाह मोलमजुरी व कोंबडी (पशु) पालनातून होतो आहे.  ५ ऑक्टोबर रोजी सौ.राणी नवनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चारायला सोडलेल्या कोंबड्या शेजारी असलेल्या अनिल उर्फ राजेंद्र महादेव हाराळ यांच्या अंगणात गेल्याने, त्याने कोंबड्यांना दगडं मारण्यास सुरुवात केली.

एका कोंबडीला जोराचा दगड लागल्याने ती मरणं पावली. कोंबड्यांचा ओरड झाल्यानंतर नमूद फिर्यादी चे पती नवनाथ कांबळे यांनी बाहेर येउन नमूद प्रकार पाहीला व अनिल हराळला जाब विचारला. तर राग अनावर होऊन, अनिलने नवनाथ कांबळे यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत झटापटी केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कांबळे यांच्या पत्नी सौ. राणी कांबळे यांनाही हराळ यांच्या पत्नी छाया यांनीही अश्लील शिवीगाळ व जातीवाचक शब्द प्रयोग केले.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण , नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ., म्हणाले …

तुम्ही कसे राहता तेच बघतो.? म्हणत, तुम्ही गावात पीठ महाग केलयं.. मी ड्रायव्हर आहे. दिडफुटया तुला व तुझ्या पोराला गाडीखाली चिरडून टाकींन..!तुम्हा भिकार लोकांनां जिवंत सोडणार नाही.! तुम्हाला येथे येऊन राहण्याची गरज काय.? म्हणत, मारहाण केल्याने. सौ. राणी नवनाथ कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल ऊर्फ राजेंद्र महादेव हाराळ व सौ. छाया अनिल हाराळ राहणार निमगाव खलु यांचे विरोधात भादवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटीचे ३(१)(r) व ३(१)(s) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 हे पण पहा – धक्कादायक.. अल्पवयीन मुलीचे अपहरण

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: