अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश

0 1,128
बीड –  मागच्या काही दिवसांपूर्वी डोंबीवली (Dombivali) परिसर एका अल्पवयीन मुलीवर ( minor girl) ३३ जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना उघडीस आल्याने संपूर्ण राज्यात या घटनेनंतर संताप्त व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता परत एकदा राज्यात खळबळ उडाली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) येथे एका अल्पवीयन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. (A minor girl was raped by 400 people, including a police officer)
Related Posts
1 of 1,608
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार  काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली. मात्र या पीडित मुलीला वडिलांनीही  सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे असहाय्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली. एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल 400 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आल्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान या घटनेला वाचा फुटली आहे.

हे पण पहा – नऊ ते दहा दिवसात चौकशी पूर्ण करून शासनाला अहवाल दिला जाईल – राधाकृष्ण गमे

याप्रकरणी बालविवाह लावून दिल्याच्या कारणावरून वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणाऱ्या अन्य आरोपींची नावं यामध्ये उघड होणार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (A minor girl was raped by 400 people, including a police officer)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: