सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचा मोठा निर्णय; हनुमान जयंतीनिमित्त आता ..

14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते, तर 15 एप्रिल रोजी देशभरातील जैन संप्रदायातील लोक महावीर जयंती साजरी करतील, 15 एप्रिल हा गुड फ्रायडे देखील आहे. दुसरीकडे, महावीर जयंती 16 एप्रिलला आणि इस्टर 17 एप्रिलला आहे. कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सर्व नागरिकांनी पोलिसांची परवानगी घ्यावी तसेच कोणताही कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी लोकांना कायदा मोडू नका आणि ध्वनी प्रदूषणाशी संबंधित नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि झारखंडसारख्या देशातील अनेक राज्यांमध्ये जातीय संघर्ष पाहायला मिळाला. (A major decision of the state government in terms of security; Now on the occasion of Hanuman Jayanti ..)