केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ६ कामगारांचा जागीच मृत्यू

0 244
A horrific explosion at a chemical company; 6 workers died on the spot
 प्रतिनिधी DNA मराठी टीम 
 गांधीनगर : रविवारी रात्री एका केमिकल कंपनीत (Chemical Company) भीषण स्फोट झाल्याने आतापर्यंत ६ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच एक कामगार बेपत्ता असल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या बेपत्ता कामगाराचा शोध सुरू आहे. ही दुर्घटना गुजरातमधील (Gujarat)भरूच (Bharuch) शहरामध्ये घडली आहे.  (A horrific explosion at a chemical company; 6 workers died on the spot)
Related Posts
1 of 2,420
मिळालेल्या माहितीनुसार, भरूच येथे रविवारी रात्री उशिरा ओम ऑर्गेनिक या केमिकल कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्फोटात ६ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. काही वेळानंतर भरूच येथील पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार रिअॅक्टरच्या जवळ काम करत होते, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

भरूचमध्ये दुर्घटनांचं सत्र

भरूचमध्ये याआधीही अनेकदा केमिकल कंपन्यामध्ये स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जीआईडीसीतील एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन २३ फेब्रुवारी २०२१ रोजी २४ जण जखमी झाले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्येही झालेल्या एका दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता.  (A horrific explosion at a chemical company; 6 workers died on the spot)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: