DNA मराठी

जुनी पेन्शनसाठी भरलेल्या शाळा सोडल्या… A few schools were filled in a row in the city.

नगर शहरासह तालुक्यात शुक्रवारी काही शाळा भरल्या होत्या.

0 97

नगर : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांनी शहरासह नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षकांनी भरविलेल्या शाळा सोडून देण्यात आल्या. या संघटनांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्यावर गुन्हा Blackmail based on video

नगर शहरासह तालुक्यात शुक्रवारी काही शाळा भरल्या होत्या. याची माहिती समजताच, जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे वैभव सांगळे, माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, अमोद नलगे, खासगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष सखाराम गारुडकर, नंदकुमार शितोळे, भाऊसाहेब जीवडे, शिक्षक भारतीचे बाबासाहेब लोंढे, गोवर्धन पांडुळे यांनी शुक्रवारी सकाळी शहर व नगर तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. ज्या शाळा भरल्या होत्या. तेथे जाऊन आंदोलक शिक्षकांनी सर्व भरलेल्या शाळा सोडून दिल्या, A few schools were filled in a row in the city.

Related Posts
1 of 2,455

सर्व शिक्षक, शिक्षकेतरांनी संपात सहभागी शाळा बंद ठेवण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: