प्रतिनिधी DNA मराठी टीम
मुंबई – राज्यातील राजकारणात मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मागच्या काहीदिवसांपासून चर्चेत आहे. गुढीपाडव्यानिमित्त (Gudipadva)झालेल्या सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली होती तसेच या सभेमध्ये त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राज्यात अनेक चर्चंना उधाण आले आहे.
यातच आता आज पुन्हा एकदा राज ठाकरे उत्तरसभा घेणार आहे. ही सभा ठाण्यात होणार आहे. उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी एक सूचक ट्विट (Tweet) केलं आहे.
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 12, 2022
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज सकाळी एक ट्विट करून ‘लाव रे तो व्हिडिओ’ पुन्हा गाजणार असल्याचं म्हटलं आहे. राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर ज्यांना “लाव रे तो व्हिडिओ”ची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी आजची सभा खास असल्याचं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ठाण्यातील तलावपाळी येथे आज संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या आवाजातील एक टीझर देखील मनसेकडून जाहीर करण्यात आला आहे.