विनयभंग प्रकरणी काष्टी येथील चार जणांवर पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने गुन्हा दाखल

श्रीगोंदा :- तालुक्यातील काष्टी (Kashti) येथील पिडीत मुलीचे जवळच राहणाऱ्या चार जणांनी एक वर्षापूर्वी पाणी भरण्याच्या कारणावरून वाद होऊन तिला चौघांनी बेदम मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या रागातून दाखल केलेला गुन्हा माघारी घे म्हणत दि.२० मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलीच्या घराचा दरवाजा उघडून घरात घुसून चौघांनी पीडितेच्या अंगाशी लगट करत तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पिडीत मुलगी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने पिडीत मुलीने पोलिस अधीक्षक तसेच पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने पोलिस आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने दि. २ एप्रिल रोजीचार आरोपी यांच्यावर विनयभंगाची गुन्हा दाखल करून घेतला.