ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंचाला मारहाण तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल

0 364
 श्रीगोंदा –   श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावातील महिला सरपंचाला तब्बल आठ जणांनी मिळून जबर मारहाण केल्या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात विनयभंगासह जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात महिला सरपंच निवडुन आल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली मात्र या ग्रामसभेमध्ये तंटामुक्तीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला असून त्या ठिकाणी महिला सरपंचाला जोरदार मारहाण करण्यात आली आहे.
Related Posts
1 of 1,487
त्यामध्ये काही इसमांनी पाठीमागून महिला सरपंचाच्या मांडीवर मारून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून शिवीगाळ करत दमदाटी करत फिर्यादी व साथीदार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत सरपंच यांच्या फिर्यादीवरून विलास तुकाराम महाडिक राहुल सोपान महाडिक नितीन सोपान महाडिक संकेत भीमक महाडिक अनिल दशरथ महाडीक राजू बाबुराव कातोरे दशरथ बाबुराव कातोरे दिलीप तुळशीराम कातोरे या आठ जणांवर ती भादवि 143 147 354 504 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ए सी बारवकर हे करत आहेत.

हे पण पहा – काळ आला होता; पण वेळ आली नव्हती…बघा व्हिडीओ… 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: