नागपुरात मागच्या २४ तासात ९५५  जणांना कोरोनाची लागण 

0

नागपूर –   राज्यात कोरोनाचा प्रभाव जास्त प्रमाणात आता वाढत आहे .राज्यात कोरोनाबंधित रुग्णांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत आहे.  राज्यातील अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. नागपुरात मागच्या चोवीस तासात ९५५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले असून तर मागच्या चोवीस तासात १० कोरोनाबंधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी केला अर्ज

चोवीस तासात ५७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या नागपूरमध्ये ८ हजार ८४४ ऍक्टिव्ह केसेस आहे. जरीपटका, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, खामला, गणेशपेठ, लक्ष्मीनगर, बजाज नगर, हे नागपूरचे हॉटस्पॉट बनले आहे. जिल्हा परिषदचे शिक्षण विभागातील ११ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यामुळे शिक्षण विभागाच्या दैनंदिन कामकाजावर, शालेय परीक्षाच्या नियोजन व आरटीई प्रवेश प्रकियाच्या कामावर याचा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाबूर्डी तलाठ्याचा अजब प्रकार बनावट सह्या मारून जमीन केली हस्तांतर

Related Posts
1 of 1,171

 दरम्यान,अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता  कोरोना अमरावती विद्यापीठापर्यंतही पोहोचला आहे. नुकत्याच विद्यापीठाने अधिकारी कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली. या चाचणीमध्ये जवळपास ३००कर्मचारी अधिकाऱ्यांपैकी ५६ कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर यापैकी १३ कर्मचाऱ्यांच अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झाल्याची  माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

नान्नज येथील शेतक-याची नापीकीस व कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: