जुगार खेळणाऱ्या 9 जणांना अटक; अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 248
9 gamblers arrested; Action by Ahmednagar Local Crime Branch

प्रतिनिधी DNA मराठी टीम 

अहमदनगर  –   अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Local Crime Branch) कारवाई करत  तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 9 आरोपींना अटक केली आहे. तसेच या कारवाईत  56 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

जुना संगमनेर पुणे हायवे हॉटेल रॉक ॲण्ड रोल्स चे आडोशाला उसाचे कडेला संगमनेर खुर्द , ता . संगमनेर येथे अनिल एकनाथ राक्षे हा स्वताचे अर्थीक फायदया करीता काही इसमांना गोलाकार बसुन तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतो व खेळवितो असल्याची माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
Related Posts
1 of 2,326
या माहितीवरून  पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल ,पोना शंकर चौधरी, पोना रविकिरण सोनटक्के, पोकॉ लक्ष्‍मण खोकले पोकॉ  राहुल सोळुंके , पोकॉ रणजीत जाधव  या पोलीस अमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन छापा मारला. अनिल एकनाथ राक्षे, रविंद्र श्रीधर रुपवते, रावसाहेब बन्सी इंगळे , लक्ष्मण बाळासाहेब जगताप , महंमद हुसेन सय्यद , नारायण रामभाऊ रुपवते , शुभम गोपाल शाहु , सोमनाथ शंकर रहाणे आणि बाळासाहेब भिमाजी मांडे हे जुगार खेळताना आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक ताब्यात घेत त्यांच्याकडून 56 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन अडबल यांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास संगमनेर शहर पोलिस करत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: