श्रीगोंदा तालुक्यात ग्रामपंचायत साठी सरासरी 90 टक्के मतदान

0 10

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायत साठी आज श्रीगोंदा तालुक्यात मतदान पार पडले असून काही गावे वगळता तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान पार पडले आहे असे मिळून सरासरी श्रीगोंदा तालुक्यात 90 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आज तालुक्यातील घुंगलवडगाव अजणूज शेडगाव तसेच आढळगाव या ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली सकाळी मतदान करण्यासाठी मतदारांचामोठ्या प्रमाणात ओघ दिसून येत होता मात्र दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यावर काहीसा ओघ कमी झाला होता मात्र सायंकाळी परत जोमाने मतदान प्रक्रिया सुरळीत पणे पार पडली यासाठी सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Posts
1 of 1,301


तालुक्यातील ५९ग्रामपंचायतींसाठी मतदान झालेआहे त्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष ५८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे २१३मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी दिली

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: