भाजप जिल्हाध्यक्ष विधी आघाडीच्या अध्यक्ष पदी अँड. प्रवीण सानप तर जिल्हा उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी मनोज कुलकर्णी

0 9
जामखेड – अहमदनगर जिल्हा विधी आघाडीच्या अध्यक्षपदी अँड. प्रवीण सानप तर जिल्हा उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी मनोज कुलकर्णी यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी दिले. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी देण्यासाठी मनोज कुलकर्णी यांची भाजपा जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी, व जामखेड भाजपा युवामोर्चा माजी तालुकाध्यक्ष  अॅड प्रवीण सानप यांची भाजपा जिल्हाध्यक्ष विधी आघाडीपदी  नियुक्तीसाठी जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांना शिफारस केली त्यानुसार कुलकर्णी व सानप यांची निवड करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विटर अकाउंट कायमस्वरूपी बंद ट्विटरने घेतला निर्णय  

या नुतन निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पा. आमदार  मोनिकाताई राजळे ,आमदार बबनरावजी पाचपुते, माजी मंत्री मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष  भानुदासजी बेरड सर, अभयजी अगरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसादजी ढोकरीकर, जामखेड पं स माजी सभापती डॉ भगवानदादा मुरुमकर, तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी अभिनंदन केले.
Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: