६९ हजारांची सुगंधीत तंबाखु व मावा बनविण्याचे मशिन जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर – शहरातील केडगाव परिसरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत ६९ हजार ३०० रुपये किंमतीची सुगंधीत तंबाखु आणि मावा बनविण्याची मशीन जप्त केली आहे. या कारवाईत कोतवाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. विशाल संतोष भगत (वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर) आणि सागर सहाधु कोतकर (वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
केडगाव परिसरातील पंचम पान शॉपी येथे एक इसम हा महाराष्ट्र राज्यात सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ कब्जात बाळगणे तसेच विक्री करण्यास प्रतिबंध असतांना तयार मावा विक्री करत असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी पोना /योगेश भिंगारदिवे ,पोकॉ सोमनाथ राउत, पोकॉ अमोल गाडे आणि पोकॉ सुजय हिवाळे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार पथकाने छापा टाकला असता बातमीच्या नमूद ठिकाणी एक इसम पैसे घेवून त्याना पुडी देताना दिसला. त्यामुळे पथकाने छापा टाकुन त्यास पंचम पान शॉप पान टपरी मध्ये बसलेल्या इसमास जागीच पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर सहाधु कोतकर (वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर) असे सांगीतले.
त्याच वेळी तेथे एका मोपेड गाडीवर काळे रंगाच्या मोपेड गाडीवर एक इसम पांढरे रंगाची मोठी पिशवी घेवून पंचम पान शॉप जवळ आला त्या वेळी तात्काळ सदर इसमास पकडुन त्याचे कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल संतोष भगत (वय २७ वर्ष रा आनंदनगर स्टेशन रोड अ नगर) असे सांगीतले व जवळील पिशवी मध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली आहे. ती मशीनवर मावा बनवणे कामी सागर सहाधु कोतकर यांचे जवळ आलो आहे असे सांगीतले.
Related Posts
त्या वरुन सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांचे कडे सुगंधीत तंबाखु व माल अक्षय बापु राहींज रा १५ ऑगस्ट कॉलनी भुषन नगर केडगाव ता जि अ नगर यांचे कडुन विकत घेतो असे सांगीतले त्यानंतर सागर सहाधु कोतकर व विशाल संतोष भगत यांनाझडतीचा उददेश समजावुन सांगुन त्याची व पंचम पान शॉप टपरीची व काळे रंगाच्या मोपेड गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणी खालील वर्णनाचा मुददेमाल मिळुन आला तो १ ) २०,००० / – रु किंमतीचे एक मावा बनविण्याचे लोखंडी मशीन व २ एचपी ची मोटार असलेली जु.वा. कि . अं . ( पंचम पानटपरी मध्ये मिळुन आली ) २ ) १,५०० / – रु किंमतीची एका पांढरे रंगाच्या गोणी मध्ये ३ किलो सुट्टी सुगंधी तंबाखुप्रती ५०० रु किलो दरा प्रमाणे किं . अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ३ ) १२०० / – रु किं ची बारीक कापलेली कत्री ( तुकडा ) सुपारी २ किलो अंदाजे प्रती प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ४ ) ६०० / – रु किंमतीचा तयार केलेला सुगंधीत मावा त्याचे वजन अंदाजे १ किलो व प्रती ६०० रुपये किलो प्रमाणे अंदाजे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) ५ ) ७५० / – रु किं ची विमल पान मसाला केसर युक्त असे छापलेला हिरवे रंगाचा पाकीटात प्रती पाकीट छापील दर १ ९ ८ रु व विक्री किंमत २५० रुपये प्रमाणे ( पंचम पान टपरी मध्ये मिळुन आली ) 10५ ) ४०,००० / – रु किं ची एक काळ रंगाची सुझुकी एक्सेस मोपेड मोटार सायकल तीच्या पाठीमागील बाजुस MH १६ CN ४ ९ ४ ९ असा क्रं असलेली जुवाकिअं ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कवज्यात मिळुन आली ) ६ ) ६,००० / – रु किंची सुगंधीत तंबाखु व सुपारी असे एकत्र केलेली अंदाजे १० किलो वजनाची प्रती किलो ६०० रु दरा प्रमाणे ( आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या कबज्यात मिळुन आली ) एकूण ६ ९ , ३०० / किमतीची सुगंधीत तंबाखु व मावा बनविण्याचे मशिन इसम नामे सागर सहाधु कोतकर वय २७ वर्ष रा MSCB च्या पाठीमागे कोतकर मळा केडगाव अहमदनगर याचे कब्जात मिळुन आल्यानेतसेच आरोपी नामे विशाल संतोष भगत याच्या ताब्यात वरिल मोपेड गाडी व एकत्र केलेली सुपारी सुगंधीत तंबाखु व सुपारी असे मिळुन आल्याने त्याचा पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे यांनी सदरचा मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे .पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे यांनी त्याचे विरुध्द भा.द.वि.कलम ३२८,१८८ , २७२,२७३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोना /योगेश भिंगारदिवे /पोकॉ सोमनाथ राउत/ पोकॉ अमोल गाडे पोकॉ/सुजय हिवाळे या पथकाने ही कारवाई केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.