श्रीरामपूरात भरदिवसा 61 हजारांची चोरी; गुन्हा दाखल

0 93
The thief stole Rs 20 lakh from the house and wrote on the TV screen I LOVE YOU

 

श्रीरामपूर – श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील इंदिरानगर परिसरातून भरदिवसा घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्यासह रोकड (Gold and cash) चोरून नेली.

 

शहरातील इंदिरानगर येथील हनुमान मंदिरासमोरील रहिवाशी प्रकाश विठ्ठल भालेराव (वय ४३, धंदा नोकरी) हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी काल भर दुपारी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील ११ हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या दांगिन्यांसह एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

 

 

Related Posts
1 of 2,107

याप्रकरणी भालेराव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भा.दं.वि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुरनं. ३२६ / २०२२ दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी हे करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: