परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात, 6 जण जागीच ठार

0 562

जयपूर –   राजस्थान (Rajasthan) मधील जयपूरच्या चाकसू (Chaksu) येथे शनिवारी सकाळी ट्रॉली आणि एक इको व्हॅनची धडक होऊन  भीषण अपघात (Accident) झाला आहे . या भीषण अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चाकसू पोलीस स्टेशन परिसरातील निमोडिया कट जवळ असणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. ज्यात व्हॅन चालकासह 6 जणांचा मृत्यू झाला असून इतर  5 तरुण जखमी झाले आहे. सर्व मृत आणि जखमी राजस्थान शिक्षक पात्रता चाचणी (REET) साठी जात होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह राज्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवले असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या जखमींवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. सर्व तरुण बारां जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी आहेत. हे तरुण REET ची परीक्षा देण्यासाठी व्हॅनमधून जात होते. चाकसू जवळ पोहोचल्यावर व्हॅन ट्रॉलीला धडकली.

अपघात इतका जोरदार होता की व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात व्हॅनमधील चालकासह 6 तरुणांचा मृत्यू झाला. तर व्हॅनमधील इतर तरुण जखमी झाले. अपघातातील 5 तरुणांवर MGH रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

पुरुषांचे हे तीन गुण अभिनेत्री मलायका अरोराला करतात आकर्षित

उद्या होणार रीट परीक्षा

राजस्थानमध्ये REET परीक्षा 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी सरकार-प्रशासन स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून लाखो उमेदवार यात सहभागी होतील. दूरच्या केंद्रांसाठी, उमेदवार आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. याचदरम्यान चाकसूमध्ये मोठा अपघात झाला आहे. सध्या पोलीस सर्व मृत आणि जखमींची नावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पत्त्याची माहिती देत ​​आहेत.

हे पण पहा  –वकिलाच्या वेशात आलेल्या दोघांकडून जितेंद्र गोगीवर गोळीबार

Related Posts
1 of 1,487
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: