साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

0 317
अहमदनगर –    राज्यात कोरोना विषाणूच्या (Corona virus) दुसऱ्या लाटेमुळे  शिर्डीचे साई मंदिर (Sai Temple) बंद करण्यात आला आहे. मंदिर जरी बंद असला तरी शिर्डीत अनेक घटना घडतच असतात याच कारणाने शिर्डी नेहमी चर्चात असते.  एका  तक्रारीच्या चौकशीत संस्थानच्या प्रशाकीय अधिकाऱ्यासह सहा जणांविरुदध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर  करण्यात आला आहे .

साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  शिर्डी पोलीस ठाण्यात साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश तथा साईसंस्थांन तदर्थ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या मंदिर भेटीचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पंतप्रधान मोदी अमेरिकामध्ये दाखल विमानतळावर जंगी स्वागत पहा हा व्हिडिओ

या संस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि सदस्य सहायक धर्मादाय आयुक्त यांनी ३१ जुलै २०२१ रोजी मंदिर परिसराला भेट दिली होती. बैठक संपल्यानंतर त्यांनी मंदिर परिसरात उपाययोजनांची पाहणी केली. मात्र, त्यांच्या या पाहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. कोरोनाच्या नियमांचा भंग करून या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात भेट दिली, दर्शन घेतले असे सांगत हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते .

Related Posts
1 of 1,481

या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला. मात्र बराच काळ चालढकल सुरू होती. शेवटी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी लक्ष घालून यासंबंधी न्यायालयात पाठपुरावा केला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यामध्ये प्रशाकीय अधिकऱ्यांसह सहा जण दोषी आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या पाहणीचे संस्थानच्या ताब्यातील फुटेज बाहेर खासगी व्यक्तींना पाठवून त्यासोबत चुकीचा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला, असा आरोप आहे.

हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज नामंजूर

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: