गुटखा प्रकरणात आतापर्यंत 5 पोलिसांचे नोंदविले जबाब

श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी रोडवरील गुटखा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून पोलीस महासंचालक यांच्या चौकशीच्या आदेशानुसार आतापर्यंत पोलिसांनी 5 पोलीस कर्मचारी यांचे जबाब नोंदविले आहेत पुढील काही काळात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्ठी रोडवरील गुटखा कारवाई झाल्यानंतर पोलिसांवर अनेक प्रकारे टिकेची झोड सुरू झाली त्यात विविध संघटनांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या असून पोलीस महासंचालक यांच्या चौकशीच्या आदेशानुसारआता कारवाईला सुरवात झाली असून या प्रकरणी विभागीय पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयात तब्बल 5 पोलिसांचे जबाब नोंदविण्यात आलेअसुन याप्रकरणी अजून पोलिसांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत याचा सर्व अहवाल पोलीस महासंचालक ,नाशिक परिक्षेत्र महानिरीक्षक ,अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना लवकरात लवकर सादर करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जामिनावर सुटलेल्या आरोपीचे जबरदस्तीने नोंदविले जबाब ?
गुटखा प्रकरणात भादवी 328 मध्ये गुन्हा दाखल करून लाखो रुपये घेऊन जेलमध्ये बसणाऱ्या आरोपी जबाब नोंदविण्यासाठी बोलविले असता त्याने पोलिसांची नावे घेतली मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई वडील यांच्यावर दबाव आणून त्यास पकडून जबरदस्ती ने पोलिसांना हवे तसे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले असल्याची जोरदार चर्चा आहे.
चोर सोडून संन्याशाला देणार का फाशी ?
गुटखा प्रकरणात एकच पोलीस दोषी असताना विभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून अनेक पोलीस कर्मचारी यांचे जबाब नोंदणी केली जात आहे त्यामुळे या प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बनावट आरोपीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर होणार
गुटखा प्रकरणात केलेला आरोपी बनावट आहेत तसेच संपूर्ण गुटखा कोणाचा आहे,कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा अंगावर घेतला अश्या अनेक प्रकारच्या खुलाष्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी केलेल्या बनावट आरोपीने एका व्यक्तीला दिले आहे ते प्रतिज्ञापत्र लवकरच न्यायालयात सादर करणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे.