जिल्हयात ४५६ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ५९९ बाधितांची रुग्ण संख्येत भर 

0

अहमदनगर:   जिल्ह्यात मागच्या चोवीस तासात  ४५६ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, मागच्या चोवीस तासात जिल्हयाच्या कोरोनाबाधीत रूग्ण संख्येत ५९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार १२१ इतकी झाली आहे.जिल्ह्यात कोरोनामुळे आता पर्यंत १ हजार १८९ जणांचा मुत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यत  ८६ हजार ७४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . अशी माहिती जिल्ह्य आरोग्य यंत्रणाने दिली आहे .

काेतवालीची वसुली करणार्या दाेन कलेक्टरांची मजल वाढली,खाकीवर उचलला हात…

जिल्ह्यात मागच्या चोवीस तासात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९० आणि अँटीजेन चाचणीत १५८ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०३, श्रीरामपूर १६ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२८, अकोले ०४, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव १९, नगर ग्रामीण १०, नेवासा १७,  पारनेर ०९, पाथर्डी ०६, राहाता ५३,  राहुरी १६, संगमनेर २८, शेवगाव ११, श्रीरामपूर ६१, कॅन्टोन्मेंट ०३  इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बोलका पंतप्रधान भेटल्यानंतर देशाचं काय झालं पाहिलं ना…- नाना पटोले

अँटीजेन चाचणीत आज १५८ जण बाधित आढळुन आले. मनपा २७,अकोले ०२, कर्जत १५, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १०, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी २५,  राहाता १९, राहुरी १७, संगमनेर ०१, शेवगाव १८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Related Posts
1 of 1,171

त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी नाराज झाले होते –  रिंकू राजगुरू

दरम्यान मागच्या चोवीस तासात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२४, अकोले ०५, जामखेड ०६, कर्जत ११, कोपर गाव ७४, नगर ग्रामीण १९, नेवासा १७, पारनेर २५, पाथर्डी १२, राहाता ४९, राहुरी १५, संगमनेर १५, शेवगाव १३,  श्रीगोंदा १५,  श्रीरामपूर ५३, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: