450 रुपये परत न दिल्याने धारदार शस्त्राने घरात घुसून हत्या

0 279

 नागपूर –   450 रुपये परत न दिल्याने नागपुरातील  पारडी परिसरात एका व्यक्तीची त्याच्या  घरात घुसून  हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली आहे.  हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काल्या डांगरे आहे.

या घटनेबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी कि नागपूरच्या पारडी भागात रविवारी झालेल्या काल्या डांगरेच्या हत्येचा उलघडा झाला आहे. उधारीचे 450 रुपये परत न केल्याने गोट्या दुर्गुडे आणि पियुष पंचबुद्धे घरात घुसून हत्या केल्याचे कबूल केले. काल्या हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गंभीर गुन्हे होते. तो पारडी परिसरात अवैध दारू विक्री करायचा.
Related Posts
1 of 1,481

काही दिवसांपूर्वी मृतक काल्या याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्याच वादातून धारधार शस्त्राने आरोपींनी काल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीत अधिकार – उच्च न्यायालय

रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास गोट्या आणि पियुष हे दोघेही काल्याच्या घरी पोहोचले. यावेळी दोघांनी आपल्याकडील धारदार शस्त्रांनी काल्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात काल्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: