कर्जत जामखेडसाठी ४५ लाख मंजूर अतिवृष्टीचे अनुदान होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

0 12

जामखेड –  डिसेंबर २०१९ जानेवारी २०२० या कालावधीत गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते.यामध्ये प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील १० व जामखेड तालुक्यातील १९ अशा २९ गावातील ६७८ शेतकऱ्यांना ४५ लाख १३ हजार मंजूर झाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आ. रोहीत पवार यांनी दिली.

आ. रोहीत पवार म्हणाले, डिसेंबर २०१९ व जानेवारी २० मध्ये अतिवृष्टी व गारपिटीचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक होते. यासाठी नुकसानग्रस्त पिकांची अधिकाऱ्यांसह बांधावर जाऊन पाहणी केली होती.तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि याबाबत पाठपुरावाही केला होता.आता कर्जत तालुक्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.

मुंबईत माझ्या जीवाला शिवसेनेकडून धोका आहे – कंगना रानौत

Related Posts
1 of 1,290

  कर्जत तालुक्यातील १० गावांतील २८७ शेतकऱ्यांना १८ लाख ११ हजार रुपयांचे अनुदान तर जामखेड तालुक्यातील १९ गावातील ३९१ शेतकऱ्यांना २७ लक्ष २ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असुन ही रक्कम  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.शेतीपिकांचे पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीचा तपशील कृषी आयुक्तांमार्फत पाठवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.संयुक्त पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती.यापुर्वी कर्जत तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५९ लक्ष एवढी रक्कम आली होती तर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी १० लक्ष एवढी रक्कम आली होती.आता तिसऱ्या टप्प्यातील रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांची  मागणी  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: