अहमदनगरच्या शेजारी असणाऱ्या ‘या’ शहरात कुरियरने आल्या ३७ तलवारी; गुन्हा दाखल

प्रतिनिधी DNA मराठी टीम
औरंगाबाद – अहमदनगर शहराच्या (Ahmednagar City) शेजारी असणाऱ्या औरंगाबाद शहरात (Aurangabad City) एकाचवेळी कुरियरने (Courier) तब्बल ३७ तलवारी (Sword) मागवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर हि घटना समोर आली आहे. एकाचवेळी शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशासाठी मागवल्या गेल्या याचा शोध पोलीस घेत आहे.
सहायक पोलिस आयुक्त (शहर विभाग) अशोक थोरात यांना शहरात कुरिअरने तलवारी आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना देऊन कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार दराडे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला.
कुरिअरच्या कार्यालयातील अधिकारी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच वाढला आणि त्यांनी आलेल्या कुरिअरची तपासणी केली. पार्सल बॉक्समध्ये एक कुकरी आणि ३७ तलवारी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तलवारी जप्त करत पुढील कारवाईला सुरू केली. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळतंय.
आता हे पार्सल कुणी मागवले होते? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. एकूण सात ग्राहकांनी या ३७ तलवारी सात वेगवेगळ्या पत्त्यावर मागवल्या होत्या. यात पाच औरंगाबादचे असून दोघे जालन्याचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (37 swords arrived by courier in the neighboring city of Ahmednagar; Filed a crime)