घर फोडून 30 हजारांचा ऐवज चोरीला; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर – कायनेटिक चौकात (Kinetic chowk) बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शिवाजी राहिज (वय ३७) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कायनेटिक चौकातील गॅलक्सी अपार्टमेंट येथे फिर्यादी राहिज वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान, राहिज यांचे घर बंद असताना घरातील कपाटात ठेवलेली २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असा ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
राजेंद्र राहीज यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.