विधवा महिलेला दागिने मोडायला लावण्याच्या प्रकरणात 3 जण निलंबित

0 624
प्रतिनिधी / दादा सोनवने :-
श्रीगोंदा –  तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील गट नंबर 31 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने वारसाची नोंद लावण्यासाठीची मागणी होताच विधवा महिलेने आपल्या कानातील झुबे मोडून (Break Jewelery) मंडलाधिकारी यांना 25 हजार रुपये (Corruption )दिले होते.  याप्रकरणी DNA मराठी कडून बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाकडून 2 मंडळ अधिकारी1 तलाठी यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Related Posts
1 of 1,487
श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील एका महिलेचा पती किरकोळ आजाराने मयत झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्यांचे वारस नोंद लावण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले त्यानुसार ती महिला तो आदेश घेऊन गावातील महिला तलाठी यांच्याकडे गेले असता महिला तलाठी यांनी याबाबत तात्काळ नोंद पकडत फेरफार नंबर दिला.  मात्र त्या काळात असलेली मंडळ अधिकारी सोनवणे यांनी त्यांची नोंद रद्द केली . मात्र कोरोनाचा चा कालावधी असल्यामुळे नोंद रद्द केलेली कोणाच्याही लक्षात आली नाही .
 काही दिवसांनी टाळेबंदी होताच संबंधित महिलेच्या ही बाब लक्षात आली त्यांनी पुन्हा महिला तलाठी देशमुख मॅडम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती घेतली असता त्यांना आपण पकडलेली नोंद सोनवणे सर्कल यांनी रद्द केली आहे हे लक्षात आले . त्यांनी संबंधीत महिलेणे तलाठी यांच्याकडे नोंद धरणेकमी विनंती केली त्यावरून महिला तलाठी देशमुख यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा नोंद पकडली . मात्र या कालावधीत सोनवने सर्कल काही कारणास्तव रजेवर असल्यामुळे त्यांचा अतिरिक्त चार्ज साबळे सर्कल यांना देण्यात आला होता .
बरेच दिवस होऊनही आपली नोंद होत नसल्याने संबंधित महिलेने साबळे सर्कल यांची भेट घेतली त्यावेळी साबळे सर्कल यांनी त्या महिलेकडे 25 हजार रुपयांची मागणी केली त्यावेळी त्या विधवा महिलेने साबळे मंडळ अधिकारी यांना सांगितले की मी फार गरीब आहे पोटासाठी मी रोज रोजनदारी करते मी इतके पैंशे देऊ शकणार नाही मग मंडळ अधिकारी साबळे यांनी सांगितले की मी तुमची नोंद मंजूर करणार नाही.
सदर महिलेला कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याने तिने आपल्या कानातील झुबे मोडून पैंशे देण्याचे ठरवले त्यानुसार त्या विधवा महिलेने शहरातील बोरा ज्वेलर्स या ठिकाणी झुबे मोडले आणि कमी पडलेले काही पैशे त्यांच्या नातेवाईक यांच्याकडून घेऊन साबळे सर्कल याना 25 हजार रुपये दिलें दरम्यानच्या काळात ही बाब पत्रकार दादा सोनवने यांना समजली असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद लावण्यासाठी विधवा महिलेने मोडले दागिने या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाला खबडून जाग आली आणि याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार श्रीगोंदा याना देण्यात आले.  त्यानुसार त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालावर कारवाई करत मंडळ अधिकारी सोनवने, साबळे,तसेच महिला तलाठी देशमुख यांना अतिशर्ती टाकून निलंबित  करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनानंतर नागरिकांतून विविध प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: