27 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0 333

अहमदनगर –  २७ गुन्हे दाखल असलेला आणि महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगार सागर भांड याला पुणे जिल्ह्यातून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील , सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी ही कारवाई केली आहे.

Related Posts
1 of 1,481
या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि ०४ ऑगस्ट २०२१ रोजी  दिलीप देवराम तमनर, (वय ३५ वर्षे, रा. तमनर आखाडा, राहूरी) त्यांचे मोटार सायकलवरुन खंडाळा, श्रीरामपूर येथून तमनर आखाडा येथे नगर-मनमाड रोडने त्यांचे घरी येत असताना रात्री ७. ४५ वा. चे सुमारास शनिशिंगणापूर फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले असता सोनई रस्त्याने काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी चार इसमांनी फिर्यादीस कत्तीचा धाक दाखवून फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल, बॅग व मोटार सायकल असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत राहूरी पो.स्टे. येथे गुरनं. ६५२ / २०२१ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापुर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे सुचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून १) नितीन मच्छिन्द्र माळी, वय २२ वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहूरी, २) गणेश रोहीदास माळी, वय २१ वर्षे, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहूरी, ३) रवि पोपट लोंढे, वय २२ वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा, ४) निलेश संजय शिंदे, वय २१ वर्षे, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर, ५) रमेश संजय शिंदे, वय २० वर्षे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी व ६) एक अल्पवयीन साथीदार यांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून राहूरी पो.स्टे. येथे हजर केलेले आहे.

सदर गुन्ह्यातील वरील नमुद आरोपी यांचा मुख्य साथीदार टोळी प्रमुख सागर भांड हा सदरचा गुन्हा केल्यापासून नजरेआड झालेला होता. श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपी सागर भांड याचा शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी सागर भांड हा रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, सचिन आडबल, दिपक शिंदे, पोका/प्रकाश वाघ, चालक पोहेकॉ/संभाजी कोतकर अशांनी मिळून रांजणगाव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून आरोपी नामे सागर आण्णासाहेब भांड, वय- २५ वर्षे, रा. मूळ रा. ढवण वस्ती, सावेडी, अहमनगर, ह.रा. रांजणगाव गणपती, धुमाळसर यांची खोली, ता. शिरुर, जि. पुणे यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत तसेच आणखी कोठे कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे वरील नमुद साथीदारांनी मिळून मागील दोन महीण्यांचे कालावधीमध्ये नगर-पुणे रोडवर, सुपा शिवार, नगर-मनमाड रोड व संगमनेर-लोणी रोड या ठिकाणी वाहन चालकांना अडूवन लुटमार केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: