महिला दिनानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने251 महिलांच्या हस्ते 1000 वृक्षांचे वृक्षारोपन

0 8

अहमदनगर –  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून  आदर्शगाव मोरयाचिंचोरे ता नेवासा येथे 251 महिलांच्या हस्ते 1000 वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले यामध्ये कडुनिंब,जांभूळ,चिंच,वड,पिंपळ या देशी वृक्षांचा समावेश होता.या वृक्षारोपन उपक्रमात मोऱयाचिंचोरे येथील महिलांसह नेवासा तालुक्यातील विविध गावातील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या महिला सदस्या यावेळी उपस्थित होत्या.

सोशल डीस्टन्स पाळत यावेळी महिलांनी वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण केले. मा खा यशवंतरावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून  मोऱयाचिंचोरे ता नेवासा येथे महिला सक्षमीकरणाचे काम 365 दिवस सुरू असते या गावात रोजच महिला दिन असतो गावाचा सर्व कारभार महिलाच पाहतात जसे की ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य सर्व महिलाच आहेत.

तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही ….. – देवेंद्र फडणवीस

Related Posts
1 of 1,290

गावातील वाचनालय सदस्य सर्व महिला आहेत.वनरकक्षण कमिटी, आदर्शगाव कमिटी,तंटा मुक्ती समिती,स्वच्छता समिती,शाळा व्यवस्थापन समिती यांचा कारभार महिला पाहतात.गावातील विकास कामांचे भूमिपूजन  व लोकार्पण ही महिलांच्या हस्ते होते.यशवंत सामजिक प्रतिष्ठान व प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतून मोरया चिंचोरे गावाची आदर्श वाटचाल आहे ती सर्वाना प्रेरणादायी अशी आहे.या गावाची ग्रामपंचायत निवडणूक यावेळी बिनविरोध झाली ही बाब ही विशेष आहे.

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विधिमंडळातील 36 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: