उसाच्या ट्रक खाली चिरडून श्रीगोंदयातील 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू..!

0 407
25 year old youth from Shrigonda dies after being crushed under sugarcane truck ..!

प्रतिनिधी DNA मराठी टीम

श्रीगोंदा –  शहरातील गणपती मळा येथील रहिवासी असलेला सचिन मच्छिंद्र गाडे हा आपल्या संबंधितांच्या लग्नासाठी मोटरसायकलवर बेलवंडी मार्गे ढवळगाव येथे जात असताना, रस्त्यात उक्कडगाव येथे उसाच्या ट्रकला (sugarcane truck)ओव्हर ट्रेक करून पुढे जाताना समोरून अचानक आलेल्या वाहनाला धडक झाल्याने अपघात घडला.(25 year old youth from Shrigonda dies after being crushed under sugarcane truck ..!)

सचिन उसाच्या ट्रक खाली पडला व दुर्दैवाने ट्रकखाली चिरडून त्याचा भयानक मृत्यू झाला आहे. ही घटना काल दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी उक्कडगाव येथील चढावर घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Related Posts
1 of 2,427

मिळालेल्या माहितीनुसार सचिन गाडे हा नियोजित लग्नासाठी ढवळगाव येथे मोटारसायकल वर जाताना रस्त्यात उक्कडगाव येथे एक ट्रक त्याच्यासमोर चढावर चालली होती. वेग वाढवून तो त्या ट्रकला over track करण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून अचानक एक वाहन आले व सचिनला धडक दिली. सचिन थेट ट्रकच्या मागील चाकाखाली पडला. त्याच्या सोबत मोटरसायकल वर मागे असलेला एक जण सुदैवाने अपघातातून बचावला आहे. तर, कंबरेपासून डोक्यापर्यंत सचिनच्या देहाचा पूर्ण चुराडा झालायं. विशेषतः सचिनच्या मागे बसलेल्या इसमाने सचिनला रस्त्यात नुकतीच लिफ्ट मागितली होती.

नमूद घटनेनंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सचिनचे शव ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेच्या अनुषंगाने भादवि कलम 304 अ व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. (25 year old youth from Shrigonda dies after being crushed under sugarcane truck ..!)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: