पहिल्या दिवशी २४८ जणांची तपासणी

0 12

जामखेड –  आ. रोहीत पवार यांच्या पुढाकाराने शहर व तालुक्यात फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला. यावेळी मधुमेह तपासणी, रक्तदाब व सिबीसी ए आय एक्स रे घेण्यात आली तसेच रुग्णांना औषधे गोळ्या वाटप करण्यात आले. यानंतर ग्रामीण आरोग्य प्रकल्प व सदाफुले वस्ती येथे रुग्णांची तपासणी करण्यात आली दिवसभरात २४८ रूग्णांची तपासणी करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून व आ. रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांचे माध्यमातून मोफत ए आय एक्सरे व सीबीसी रक्त चाचणी, ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे सकाळी नऊ वाजता कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते निदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ कुंडलिक अवसरे, माजी नगरसेवक पवनराजे राळेभात, दिगंबर चव्हाण, ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले, प्रकाश सदाफुले, महेंद्र राळेभात, उमर कुरेशी, प्रकाश काळे, हरिभाऊ आजबे, राजेंद्र शिंदे ,अमीत जाधव, बाबासाहेब मगर, इस्माईल सय्यद, सचिन शिंदे, प्रशांत राळेभात, युवा नेते महेश राळेभात, अमोल गिरमे, प्रा. राहुल अहिरे आदि उपस्थित होते .

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आ. रोहीत पवार यांनी तालुक्यात फिरता दवाखाना आणला यामुळे त्याचा फायदा शहर व तालुक्यातील ८७ गावांमध्ये होणार आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या फिरत्या दवाखान्याची प्रक्रिया चालू होत आहे. तसेच बिपी, शुगर यावर या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून व किरकोळ आजारावर मोफत औषधोपचार होणार आहेत.

Related Posts
1 of 1,290

तसेच या फिरत्या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे राळेभात म्हणाले यावेळी या शिबिरास मोठ्या प्रमाणात रुग्णांनी प्रतिसाद दिला.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: