२४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी , रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान नाही

0 258

गांधीनगर –    गुजरात मध्ये सध्या राजकीय घडामोडींना खूप वेग आला आहे. राज्याला मागच्या दोन दिवसापूर्वीच भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या स्वरूपात नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज २४ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांच्या नवीन मंत्रिमंडळात (Cabinet) माजी मुख्यमंत्री  रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील (Rupani’s cabinet) एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात १० जणांना कॅबिनेट मंत्रिपद, तर १४ जणांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे

नव्या मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी ४.३० वाजता गांधीनगर येथे आयोजित केली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. निमा आचार्य यांची विधानसभा स्पीकरपदी नियुक्ती झाली आहे. तर राजेंद्र त्रिवेदी यांनी पदाचा राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत कहल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शपथविधी सोहळा बुधवारी दुपारी होणार होता. मात्र नव्या मंत्रिमंडळाबाबत रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होता. त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं सुरू होती. त्यानंतर हायकमांडने नाराज नेत्यांची समजूत काढण्याची जबाबदारी रुपाणी यांच्यावर सोडली होती. आज शपथविधी सोहळा पाहता नाराज असलेल्यांना बाहेरचा दाखवण्यात आला आहे.

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा आईकडून प्रियकराच्या मदतीने खून

Related Posts
1 of 1,635

मंत्री

  • राजेंद्र त्रिवेदी
  • जितेंद्र वघानी
  • ऋषिकेश पटेल
  • पूर्णश कुमार मोदी
  • राघव पटेल
  • उदय सिंह चव्हाण
  • मोहनलाल देसाई
  • किरीट राणा
  • गणेश पटेल
  • प्रदीप परमार

हे पण पहा –  Pimpri Chinchwad | दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: