
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण (Raigavan Gram Panchayat) येथील सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली रायगव्हाण चे पहिले सरपंच संजय पोपट रिकामे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कामाची संधी मिळावी अशा उदार मनाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत ठरल्या प्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत इथे ही निवड पार पडली, राहुल अशोक कदम यांचा सरपंच निवडीसाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध सरपंच घोषित करण्यात आले. या सरपंच निवडीला निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मिलिंद जाधव व तलाठी विजय मोरे यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक लता गायकवाड यांनी या निवडीसाठी सहकार्य केले. राहुल कदम यांच्या सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोरख हार्दे,व अनुमोदक उपसरपंच बाळू वाल्मीक वराळे हे होते.
यावेळी माजी सरपंच रोहिदास कदम, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश शिंदे,माजी सरपंच गोवर्धन हार्दे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत रिकामे, युवा नेते अनिल पठारे, ग्रामपंचायत सदस्य तेजश्री मनोज शिंदे,ग्रामपंचायत सदस्य ललिता त्रिंबक हार्दे,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश खोसे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
रायगव्हाण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा असून या सरपंच निवडीसाठी गावातील स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी सरपंच निवडीसाठी सरपंच पद खेचून आणण्यासाठी अनेक घडामोडी झाल्या होत्या परंतु ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी मला सरपंच पदाची ग्रामस्थांनी जि संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार असून गावातील रस्ते,पाणी,घरकुले, लाईट,सांडपाणी व्यवस्थापन,वृक्षारोपण, इत्यादींवर विकासाचा भर देणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे :- राहुल अशोक कदम, नवनिर्वाचित सरपंच रायगव्हाण