राज्यात 20 हजार कैद्यांची सुटका होणार? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0 360

नवी मुंबई –  संपूर्ण देशात मार्च 2020 पासुन कोरोनाचा (Corona Virus) प्रादुर्भाव वाढल्यानंतर देशातील अनेक तुरुंगातील आरोपींना पॅरोल (Parole) मंजूर करण्यात आला होता. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 20 हजार कैदी (20 thousand prisoners) पॅरोलवर सुटले होते.(20,000 prisoners to be released in the state? Learn the whole case)

पॅरोलच्या या कालावधीत अनेक आरोपींचा त्यांच्या मूळ शिक्षेच्या कालावधी पुर्ण झाला आहे. त्यामूळे हा कालावधी त्यांच्यामुळ शिक्षेच्या कालावधीत गृहित धरावा का या बाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायालयाने हा धोरणात्मक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्याला दिले आहे. पुढील चार आठवड्यात यासंदर्भात सुनावणी होईल.

मुंबईतील मुबीन खानला भादंवि कलम 498 आणि कलम 302 अन्वये अटक झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्याला 11 वर्षे, 8 महिने आणि 5 दिवसांची शिक्षा सुनावली होती. कोरोना संसर्गामुळे 15 मे 2020 रोजी त्याला अत्यावश्यक बाब म्हणून पॅरोल मंजूर करण्यात आला. या काळात मुबीनच्या एकूण शिक्षेचा कालावधी संपला.

औरंगाबाद खंडपीठाने त्याला 498 अ अंतर्गत दोषमुक्त केले. तर 302 अंतर्गत शिक्षा कायम ठेवली. ही शिक्षा कायम करताना राज्याने त्याच्या शिक्षेच्या एकूण कालावधीची गणना केली, पण पॅरोलचा कालावधी मोजला नाही. त्यामुळे त्याची सुटका झाली नाही. या निर्णयास त्याने अ‍ॅड. रमेश जाधव व अन्य वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

अर्जुन-मलायका लग्न करणार , अरबाज खान ने दिली “ही” प्रतिक्रिया

Related Posts
1 of 1,608

20 हजार कैद्यांची सुटका होणार?

सरकारी वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादानुसार, जन्मठेप झालेल्या कैद्याची 14 वर्षे शिक्षा पूर्ण झाल्यावर प्रिझनर्स अ‍ॅक्टनुसार मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय शासन घेऊ शकते. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्त्याला 15 मे 2020 रोजी पॅरोल मंजूर झाला नसता, तर त्याच्या 14 वर्षांच्या मूळ शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असता. त्याच्या मुदतपूर्व सुटकेसाठी विचार करता आला असता. मुबीन खानसारखेच राज्यात सुमारे 20 हजार प्रकरणे असल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगितले आहे. याबाबतचा निर्णय सरकार एका महिन्यात घेणार असल्याची माहिती आहे.(20,000 prisoners to be released in the state? Learn the whole case)

हे पण पहा- दंगल भडकवण्यामागे अनिल बोंडेचा हात – नवाब मलिक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: