बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या 20 यांत्रिक बोटी उद्धवस्त; कोटींचा मुद्देमाल जप्त

0 210
20 mechanical sand dredgers wrecked; Millions of rupees confiscated
प्रतिनिधी DNA मराठी टीम 
Related Posts
1 of 2,326

पुणे –  महसूल विभागाने आणि पोलिसांनी मोठी कारवाई करत पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीच्या (River Bhima) पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 20 यांत्रिक बोटी (Boat) जिलेटिनच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आणि महसूल विभागाने केलेली संयुक्त कारवाई तब्बल 10 तास सुरु होती. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (officer) राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी थेट भीमा नदीच्या पात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या 20 यांत्रिक बोटी नष्ट केल्या आहेत.

दौडमधील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू माफियांवर कारवाई करुन पोलीस आणि महसूल विभागाने चांगलाच चोप दिल्याचं बोललं जातंय. याठिकाणी वाळू माफियांनी अवैधरित्या वाळू चोरी करण्याचा खुलेआम बाजार मांडला होता. मात्र, आता याला कुठेतरी आळा बसल्याचं बोललं जातंय. महसूल विभाग आणि पोलिसांच्या या कारवाईत 20 यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत.

तर 10 तास चाललेल्या या कारवाईत एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात फक्त पुण्यातील दौंडमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील वाळू माफियांचा हैदोस आहे. वाळू माफियांवर कारवाई केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याचेही प्रकार राज्यात घडले आहेत. आता या सर्व प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. (20 mechanical sand dredgers wrecked; Millions of rupees confiscated)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: