डॉक्टर कॉलोनीत चोरट्यांनी घरफोडून लंपास केले २ लाख ८५ हजार 

0 7
अहमदनगर – अहमदनगर शहरातील बुरुडगाव रस्त्यावरील डॉक्टर कॉलनीत एका घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी घरातील दोन लाख ८५ हजार ऐवज लंपास केले आहे.

ही घटना मंगळवारी दि १६ फरवरी रोजी दुपारी दोन ते रात्री पावणे आठच्या दरम्यान घडली . चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीचे गज तोडून  घरात प्रवेश केला आणि सोने ,चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणात कीर्तीकुमार विजयचंद संचित यांनी कोतवाली पोलिस स्टेशनात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा  गुन्ह्यांची नोंद केली आहे पोलीस निरीक्षक राकेश  मानगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली तर या घटनेचा पुढील तपास सपोनि पवार करीत आहे.

Related Posts
1 of 1,290
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: