शरद पवार यांची राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिहरन हरिवंश यांच्यावर टीका

नवी दिल्ली- कृषि विधेयक मंजूर घेताना सरकारने घाई केली आणि विरोधकांच्या मागणीनंतरही प्रत्यक्ष मतदान घेतले नाही. राज्यसभेचे उपाध्यक्ष यांनी कृषिविद्या वर सदस्यांना आपली बाजू मांडू दिली नाही उलट सदस्यांचा विरोध केला आणि सदस्यांना निलंबितही केले.
गेल्या पन्नास वर्षाच्या संसदीय राजकारणात उपाध्यक्षांचे असे वर्तन मी पाहिले नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिहरन हरिवंश यांच्यावर टीका केली. तसेच हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.कृषी विधेयक हे नियमाच्या विरुद्ध आहे असं सांगनाऱ्या सदस्यांना उपाध्यक्षांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये जाऊन नियमपुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला .या गोंधळातच पुस्तक फाडले गेले. सदस्य काय सांगत आहेत हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षाकडून होती पण त्यांनी कुणाचे ऐकले नाही तरी आवाजी मतदान घेऊन त्यांनी हे विधेयक मंजूर करून घेतलं .सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आले.
त्यामुळे गेल्या पन्नास वर्षात मी अधिकाऱ्यांचा असं वर्तन पाहिलं नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हे ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकुर यांच्या विचारांवर चालणारे आहेत पण कालच्या वर्तनावरून त्यांनी ठाकूर यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आमचा भ्रमनिरास झाला असे सांगताना सदस्यांना निलंबित करून त्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे, सरकारने विधेयकावर पुनर्विचार करून हे विधेयक तात्काळ रद्द करावे अशी मागणी शरद पवार यांनी केली.