“या” दिवशी लागणार बारावीचा निकाल? , जाणून घ्या संपूर्ण माहिती

0
पुणे –  राज्यात मागच्या आठवड्यात दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या निकालात 99. 95 टक्के विध्यार्थीं पास झाले असून जवळपास 0. 05 विध्यार्थी नापास झाले आहे. दहावीच्या निकालानंतर आता बारावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. (12th result on “this” day? , Learn the complete information)

बारावीच्या निकालाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यात म्हणजे जुलै महिन्यातच बारावीचा (12th Result) निकाल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल येत्या 21 जुलैला लागण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वी निकालाची तारीख ऑगस्ट महिन्याची होती. यापूर्वी 4 ऑगस्टपर्यंत हा निकाल लागू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

अनिल देशमुख ‘नॉट रिचेबल’…? ‘ईडी’कडून शोधाशोध…….

Related Posts
1 of 1,153
दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसेच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा (intranal) , असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

 

दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघताना ओव्हरलोड झाल्यामुळे साईट क्रॅश झाली होती. ही अडचण बघता बारावीच्या निकालाच्या दिवशी अशी कोणतीही तांत्रिक अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाकडून अजूनही अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पण जर २१ तारखेला जर निकाल जाहीर होणार असेल तर उद्या दुपारपर्यंत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) या संदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे. (12th result on “this” day? , Learn the complete information)

दारु वाहतूक करणाऱ्या वाहनातील मालाची लुटमार करुन विल्हेवाट लावणाऱ्या टोळीतील फरार आरोपी जेरबंद

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: