राज्यातील साखर कामगारांना १२ टक्के पगारवाढ मंजूर ……..

0 241
श्रीगोंदा  :-   महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा गेली दोन – अडीच वर्षापासुन प्रलंबीत असलेला प्रश्न माजी केंद्रीय कृषि मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब (MP Sharad Pawar)  यांचे मध्यस्थीने अखेर मार्गी लागला असुन कामगारांना दि . १ एप्रिल२०१ ९ पासुन १२ टक्के पगारवाढ देण्यास मंजूरी देणेत आली असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन तथा त्रिपक्षीय समितीचे सदस्य राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली .
 महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांचा पगारवाढीचा २०१४ मध्ये झालेला करार दि . ३१ मार्च२०१ ९ रोजी संपुष्टात आलेला होता . त्यामुळे दि . १एप्रिल२०१ ९ पासुन नविन करार करुन साखर कामगारांच्या पगारवाढीची मागणी कामगार युनियने केलेली होती . त्यानुसार यावर योग्य तोडगा काढून शिफारस करणेकरीता राज्य शासनाने मालक प्रतिनिधी , शासन प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी अशी राज्यस्तरीय त्रिपक्षीय समिती स्थापन करुन सदर समितीस पगारवाढी संदर्भात शिफारस करणेची सुचना दिलेली होती . त्यानुसार गेली सहा महिने समितीच्या बैठका होत होत्या परंतु निर्णय होत नव्हता .
शेवटी या निर्णय  प्रक्रियेमध्ये माजी केंद्रीय कृषि मंत्री व देशाचे नेते मा . खासदार शरद पवार यांनी मध्यस्थी करुन साखर कामगारांना दि . १ एप्रिल२०१ ९ पासुन १२ टक्के पगारवाढ देणे व इतर मागण्या मान्य करुन यशस्वी तोडगा काढणेत आलेला असल्याची माहिती नागवडे यांनी दिली . साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगांवकर यांचे अध्यक्षतेखाली साखर संकुल पुणे येथे गुरुवार दि . ९ सप्टेंबर रोजी झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेणेत आला असुन या बैठकीस साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे , आबासाहेब पाटील , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , राजेंद्र नागवडे , कल्लप्पा आवाडे , चंद्रदीप नरके , साखर आयुक्त शेखर गायकवाड , कामगार आयुक्त तसेच साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ , कामगार युनियनचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे , आनंदराव वायकर आदि मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते .
Related Posts
1 of 1,608
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: