मढेवडगाव सोसायटी मतदार यादीतून ११४ बोगस मतदार अपात्र तर..

0 137
114 bogus voters disqualified from Madhewadgaon Society voter list.

 

श्रीगोंदा  : मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमात संस्थेच्या सचिव, पदाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गोंधळामूळे संस्थेचे वाभाडे निघत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली सचिवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात बोगस मतदार वगळण्याचा आदेश असूनही त्या मतदारांना पुन्हा यादीत समाविष्ट करणे, एक संचालक निलंबित असूनही त्याचा मतदारयादीत समाविष्ट करणे, व नियमित खऱ्या खातेदार कर्जदारांना वगळण्याचा प्रयत्न करणे याला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी हरकतींवर दिलेल्या निकालात चपराक बसवली आहे.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि.३१ मार्च रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करायची होती. त्यावर ३१ मार्च ते११ एप्रिलला हरकती मागितल्या होत्या. प्रत्यक्षात हरकतींवर २१ एप्रिल रोजी निकाल देणे व दि.२६ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या निवडणूक आचार संहितेमुळे  हरकतींवर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्याअगोदर निकाल देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात दि. २९ रोजी हरकतदारांच्या हातात संस्थेने निकाल दिला.

 

Related Posts
1 of 2,357
बोगस १०४  मतदारांना दि. जिल्हा उपनिबंधक यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२१ च्या निकालात बोगस सभासदांचे सभासदत्व रद्द केले होते तरीही सचिवांनी या बोगस मतदारांचे मतदार यादीत नावे टाकली होती. निलंबित संचालक जगन्नाथ पाटोळे यांचे सभासदत्व रद्द करूनही सचिवाने त्यांचा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेने पशुखाद्य कर्जदारांची मुदतवाढ देऊनही संचालक व पदाधिकाऱ्यांनी त्यांना थकबाकीदार ठरवून खातेदार सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव केला होता अखेर खऱ्या कर्जदार सभासदांनी नोंदविलेल्या हरकतींवर काहीच कार्यवाही होत नसल्याने या सभासदांनी सहकार निवडणूक आयुक्तांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर तात्काळ हालचाली होत दि.२९ एप्रिल रोजी निकाल दिला. या निकालात निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकार यांनी दिलेल्या निकालात १०४ बोगस मतदारांचे नावे वगळली, खोटे कागदपत्रे देऊन संचालक झालेल्या संचालकाला मतदार यादीतून वगळले व खऱ्या ३८ पशुखाद्य कर्जदार सभासदांना मतदार यादीत कायम ठेवून त्यांना न्याय मिळाला. आधीच विविध घोटाळ्यात चार संचालक बाद झालेले असूनही राजकीय अड्डा केलेल्या संस्थेला  जिल्हा उपनिबंधक यांनी निकाल देऊन चांगलीच चपराक दिली आहे.

 

 प्रवीण वाबळे, कर्जदार सभासद व हरकतदार -संस्थेने मारले परंतु अधिकाऱ्यांनी तारले.-
” गेल्या पाच वर्षांपासून विविध घोटाळ्यांमूळे गाजत असलेल्या मढेवडगाव विविध कार्यकारी संस्थेच्या सचिव व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी बोगस मतदार पात्र ठरवण्यासाठी गेल्यावर्षी अधिकाऱ्यांनी वगळण्याचा निकाल देऊनही बेकायदेशीर नावे पाठवली व निलंबित संचालकाला परत मतदार यादीत आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करून जिल्हा बँकेचा आदेश डावलून कर्जदार सभासदांना वगळण्याचा डाव आखला होता. परंतु संस्थेने आमच्यासारख्या खऱ्या सभासदांना मारले परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तारले.”
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: