दरीत बस कोसळल्याने ११ जणांचा जागीच मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

0 303
श्रीनगर –  जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मध्ये चिनाब नदी (Chenab river)च्या पात्राजवळ बस चालकाचे  बस वरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली या भीषण अपघाता (Accident) मध्ये ११ जणांचा जागीच मुत्यू झाला आहे.  या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आता रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही मिनी बस (Mini bus) थाथरीहून डोडाकडे जात होती. सध्या मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून  अनेक जण गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.(11 killed in bus crash in valley, Modi announces help)
या अपघताबद्दल केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह (Dr. Jitendra Singh) यांनी माहिती देत सांगितले कि जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे थाथरीजवळ झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. डीसी डोडा विकास शर्मा यांच्याशी बोलणं झालं आहे. जखमींना जीएमसी डोडा येथे घेऊन जात आहे. यापुढे जी काही मदत लागेल ती करण्यात येईल.
Related Posts
1 of 1,603
तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी देखील या अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मद्दत जाहीर केली आहे .   ही घटना अत्यंत दुख:त आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. PMNRF च्यावतीने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत दिली जाईल. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल.असा ट्विट मोदी यांनी केला आहे. (11 killed in bus crash in valley, Modi announces help)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: