जबरी दरोडयातील ११ दरोडेखोरांना तीन दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद 

0 13

हिंगोली-  शहरात असलेल्या सुराणा नगरात दि. ७ मार्च रोजी २ ते ३० मिनिटांच्या सुमारास या दरोडेखोरांनी घराचे चॅनलचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून दोन लाख २६ हजाराचा सोने, चांदीच्या दागिन्यासह या दरोडेखोर पसार झाले होते  . परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने. फक्त तीन दिवसातच त्या दरोडेखोरांचचा छडा लावून ११ दरोडेखोर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती   १२ मार्च शुक्रवारी पत्रकार आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  हिंगोली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी दिली.

येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.१२ ) पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे ,ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. तायडे आदींची उपस्थिती होती.यावेळी यशवंत काळे बोलताना म्हणाले, सुराणा नगरात (ता.७) मार्च रोजी जवानाच्या घराचे कुलूप तोडून दहा ते पंधरा  दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील आई, वडील, यांच्या गळ्यावर तलवारीचा धाक दाखवून सोन्या, चांदीच्या दागिन्यासह दोन लाख २६ हजाराचा मुद्देमाल पळविला होता. घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह अधिकारी भेटी देऊन पाहणी केली.

रेखा जरे हत्या प्रकरण- पत्रकार बाळ बोठेला अटक

त्यानंतर सायबर सेल, फिंगर प्रिंट, डॉगस्कोडच्या मदतीने माघ काढण्याचे प्रयत्न चालविले होते. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण ठाणे यांच्या वतीने दरोडेखोरांना अटक करण्यासाठी संयुक्त पाच पथकाची नियुक्ती केली. त्यानुसार गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपासाची चक्रे फिरविण्यात आली. गोपनीय माहितीनुसार दरोडेखोर जालना जिल्ह्यात असल्याची कुणकुण लागली, त्यानुसार पथक रवाना झाले. जालना जिल्ह्यातील चितळी, पुतळी , विरेगाव तांडा, पिंप्री डुकरे या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांच्या व गुप्त बतमीदारांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील माहिती घेऊन हे दरोडेखोर ज्या ठिकाणी लपले होते त्या ठिकाणी त्यांना पकडण्यासाठी गेले असता  दरोडेखोरांनी नदी ,नाल्यातून, उसाच्या फाडातून पळ काढत असताना त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा शरद पवार यांनी केला स्वागत …

Related Posts
1 of 1,290

अटक केलेल्या आरोपीना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार ,सोन्या चांदीचे दागिने ,तीन एलईडी टीव्ही ,मोटार सायकल, पिकअप असा एकूण मिळून १० लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील आरोपी हे जालना, बीड, परभणी जिल्ह्यातील असून हिंगोली जिल्ह्यातील एकही आरोपी नाही, केवळ जिल्ह्यातील सूत्रधार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मला वनमंत्री पद द्या शिवसेनेच्या या नेत्याने केली उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यतीश देशमुख , विवेकानंद वाखारे , उदय खंडेराय, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे बळीराम बंदखडके, आर. व्ही. तायडे शिवसांब घेवारे, के. डी. पोटे, संतोष वाठोरे, भगवान आडे, संभाजी लेकुळे, अशोक धामणे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, शेख मोहम्मद, निलेश हलगे, जय प्रकाश झाडे, कुलदीप चव्हाण, यांच्यासह बाबई ,चितळी, पुतळी ,कवठा या गावातील लोकांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

शारीरिक संबंधासाठी बांधले खुर्चीला हात त्यानंतर पत्नीने चाकूने कापला गळा 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: