श्रीगोंदा तालुक्यातील 10 गावे पुन्हा लॉक डाऊन….. जाणून घ्या संपूर्ण माहिती

0 334
प्रतिनिधी – सर्जेराव साळवे
श्रीगोंदा –   अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar district)दिवसाला ५००- ८०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे.प्रशासनाने ही आकडेवारी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील १० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असलेल्या 9  गावांत कडक लॉकडाऊन (Lock Down) जाहीर केले आहे त्यामध्ये काष्टी, बेलवंडी बु, घारगाव, येळपणे, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मढेवडगाव, शेडगाव, कोठा या गावांमध्ये ४ ऑक्टोबर  ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Dr. Rajendra Bhosale) यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही बंद असणार आहेत.
लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ या वेळेत सुरू राहतील. गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.अशी माहिती श्रीगोंदा चे तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी DNA मराठी  शी बोलताना दिली.
Related Posts
1 of 1,481
 वारंवार गाव लॉक डाऊन होत असल्यामुळे बेलवंडी येथील व्यापारी वैतागले आहेत. व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे. दुकानाचे भाडे , लाईट बिल, कामगारांचे पगार,बँकांचे हप्ते आदी बाबी मुळे व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे, काही दुकांदाराचे प्रपंच हे व्यवसायावर अवलंबून असल्याने उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून इतर पर्याय प्रशासनाने काढावा अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने DNA मराठी शी बोलताना दिली.

हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: