जामखेड येथील १० सायकलस्वारांनी १९ तासात केली रायगड वारी

0 12
जामखेड –  जामखेड ते प्रतापगड सायकल प्रवास २८५ कि. मी. अवघ्या १९ तासात पूर्ण करत सर्व सायकल स्वार सुखरूप घरी परतले. येथील दहा सायकलस्वारांनी या प्रवासात ठिकठिकाणी पर्यावरण व सायकलींगमुळे होणारे शारीरिक फायदे याबाबत संदेश दिला. मागील दोन वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम चालू आहे.

सरकारी वकीलच्या घरी भरदिवसा चोरी करून चोरट्यांनी लंपास केले 50 तोळे सोने  

  सायकलस्वारांनी ५ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता हा प्रवास जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ( जयहिंद चौक) येथून प्रवासास सुरुवात केली. यामध्ये डॉ पांडुरंग सानप, डॉ महेश घोडके , डॉ अशोक बांगर , हॉटेल व्यावसायिक दिलीप पवार,  शशिकांत राऊत , भास्कर भोरे, उमेश घोडेस्वार, समीर शेख , आर्यन सानप (१४ वर्ष) ,  आणि अभिषेक घोडके (१४ वर्षे) घेत प्रवास पूर्ण केले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारक-यांनी जागो जागी स्वागत करत चहा, नाश्त्याची सोय केली व कौतुक केले.
Related Posts
1 of 23

                                  कोरोना रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेला आरोपीला धुळे येथून अटक  

 पहिल्या दिवशी १९० कि. मी. सायकल प्रवास करत वाटर स्टेशन येथे मुक्काम करून ६ फेब्रुवारी  रोजी उरलेले उर्वरित प्रवास पूर्ण करत संध्याकाळी ५ वाजता प्रतापगड गडावर जाऊन सायकल प्रवासास पूर्ण विराम दिले . डॉ महेश घोडके यांनी प्रवासास शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले आणि समीर शेख यांनी जय शिवराय घोषणा देत या प्रवासाचा समारोप केला. या सायकल प्रवासाबद्दल बोलत असताना डॉ महेश घोडके यांनी पर्यावरण संरक्षण जनजागृती करण्याची व सायकलिंग मुळे होणारे शारीरिक फायदे समजून सांगत सर्वाना आपल्या शरीराची काळजी घ्यावी व आपले जिवन निरोगी जगावे असे सर्वाना आव्हान केले.

 

जर ऑपरेशन लोटस झाले तर राज्यात भाजपचा राहणार नाही – नाना पटोले 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: