उक्कडगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेसाठी रु.१ कोटी ७२ लक्ष निधी मंजुर –मा.आ. राहुल जगताप

0 56
Rs 17.00 crore sanctioned for construction of 21 dams in Shrigonda taluka - Rahul Jagtap

 

श्रीगोंदा:- श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील पाणी पुरवठा योजनेसाठी रु.१ कोटी ७२ लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे. येथील परिसरातील नागरीकांना नेहमीच पाण्याचा प्रश्न भेडसावत असे तसेच वाड्या वस्त्यांवर देखील पाण्याचा प्रश्न भेडसावत असे.

 

त्यामुळे याभागांमधून पाणीपुरवठा योजनेसाठी सतत मागणी केली जात होती. त्यामुळे या भागातील नागरीकांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी काढणेच्या दृष्टीने सदरची पाणी पुरवठा योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून मंजुर करणेत आलेली आहे. यामध्ये दोन टाक्यांचा व पाईपलाईनचा समावेश आहे. वाड्यावसत्यांवर देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Related Posts
1 of 2,177

तसेच याच परिसरातील दोन तलावांच्या दुरुस्तीच्या कामाला देखील मंजुरी मिळाली असून तलाव दुरुस्तीसाठी रु.३९.०० लक्ष निधी मंजुर करणेत आला आहे.
या कामासंदर्भात चेअरमन दत्तुआण्णा कातोरे, सरपंच मच्छिंद्र कातोरे, उपसरपंच बापु कातोरे, बापू रावसाहेब कातोरे, संजुपाटील कातोरे, महादेवदादा महाडिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी पाठपुराव केला. तसेच काम मंजुर केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनच्या वतीने मा.आ. राहुलदादा जगताप पा. यांचे आभार व्यक्त केले.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: