९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच – ठाले पाटील

0 32

 नवी मुंबई –  ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नाशिकमध्येच घेण्यात येणार आहे अशी माहित  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली आहे . मात्र, नाशिकच्या संमेलनस्थळावर शिक्कामोर्तब करताना महामंडळाच्या घटनेलाच तिलांजली देण्यात आली आहे, असा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

नाशिक की दिल्ली, या दोन स्थळावरून ३ जानेवारीच्या बैठकीतही खडाजंगी झालेली असून महामंडळातही दोन गट असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र नाशिकबाबतचा निर्णय हा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीनेच घेण्यात आल्यामुळे घटनेतील नियमाला फाटा वगैरे असे काही म्हणता येणार नाही असा स्पष्ट मत महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व्यक्त केला आहे.

     नगर शहरातील शिवभोजन केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची ‘सरप्राईज व्हिजीट’

मागच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत पार पडला होता. तेव्हा या संमेलनात  व्यासपीठावर सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांना प्रेक्षकांमध्ये बसवण्यात आले होते. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तीला बसवले तर त्यांच्याच विधानाला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे राजकीय व्यक्तीला संमेलनाच्या मंचावर स्थान नको, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Related Posts
1 of 1,301
उस्मानाबादेत त्याचे पालन करण्यात आले होते. मात्र, नाशिकमधील संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार यांना स्थान देणार की त्यांना प्रेक्षकांमध्ये बसवणार, असा प्रश्न जेव्हा  अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना करण्यात आला तेव्हा त्यांनी यासंदर्भात  स्पष्ट उत्तर न देता, यापूर्वी आळंदीच्या संमेलनात शरद पवार, गोपीनाथ मुंडे व अन्य एका संमेलनात विलासराव देशमुख हे प्रेक्षकांमध्ये बसल्याची आठवण सांगितली. नेते खाली बसतात. केवळ सुशीलकुमार शिंदे यांनी कुरकुर केली होती असे सुध्दा  कौतिकराव ठाले पाटील  म्हणाले. नेत्यांना व्यासपीठावर स्थान नको, अशी महामंडळाची भूमिका आजही आहे. मात्र, ऐनवेळी काय होते ते पाहू असे उत्तर  कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले आहे. आता यावेळी संमेलनात काय होते हे पाहावे लागणार आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: