८५ टक्के जनतेचं काय , आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल !

0 30

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यापासून मराठा समाज पेटून उठला आहे .या पार्शवभूमीवर पोलीस भरती ,एमपीएससीनोकर भरतीसाठीच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी दर्शवत टीका केली आहे.

ही परीक्षा रद्द करताना सरकारनं एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचे काय?असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘वेळ आल्यास तलवारी काढू,असा इशारा दिला होता.

Related Posts
1 of 257

मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: