५५ वर्षांत प्रथमच प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीत होणार परेड

0 26

नवी दिल्ली – भारतात प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळया राज्यांची पथके, प्रमुख पाहुणे तसेच मोठया संखेने प्रेक्षक ह्या परेड साठी देशाची राजधानी दिल्ली येथे हजेरी लावत असतात.

मात्र यावर्षी संपूर्ण जगात हाहाकार माजलेला कोरोनाविषाणू मुळे केंद्र सरकारने खबरदारी घेत प्रत्येक वर्षी मोठ्या थाटाने होणारी परेड मध्ये काही बदल केले आहे.
Covid-19 मुळे आज अशी दिसणार प्रजासत्ताक दिनाची परेड

प्रमुख पाहुणे नाहीत –

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मित्र राष्ट्रांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केलं जातं. मात्र यावर्षी कोरोना विषाणूमुळे प्रमुख पाहुणे न बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या आदी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन कोविड – 19 च्या साथीमुळे येऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुण्यांची अनुपस्थिती ही ५५ वर्षांत प्रथमच होईल.

यापूर्वी १९५२, १९५३ आणि १९६६ मध्ये देखील कोणतेही प्रमुख पाहुणे परेडसाठी उपस्थित नव्हते.

Related Posts
1 of 1,290

प्रेक्षकांची उपस्थिती आणि ठिकाण –

ह्यावर्षी प्रेक्षकांची संख्या ही कमी करण्यात आली आहे. जास्त गर्दी होऊ नये आणि सुरक्षित अंतर राखलं जावं यासाठी ह्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मागच्या वर्षी १ लाख २५ हजार प्रेक्षक हे परेड पाहण्यासाठी उपस्थित होते मात्र यावेळी ही संख्या कमी करून फक्त २५ हजार करण्यात आली आहे. यावर्षी सर्वसाधारण सार्वजनिक तिकिटांची किंमत ही ४ हजार ५०० रुपये इतकी सांगितली आहे. यावेळी परेडचा कालावधी सुद्धा कमी करण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: