४९ पैकी १९ ग्रामपंचायतसाठी १३७ उमेदवारी अर्ज दाखल…..

0 25
जामखेड – तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसअखेर १९ ग्रामपंचायतसाठी एकूण १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सोमवारी इच्छुकांनी एकूण १२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर ३० ग्रामपंचायतसाठी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. सर्वात जास्त उमेदवारी अर्ज पिंपरखेड येथून ३८ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस बाकी आहेत अनेक इच्छुक कागदपत्रे जमा करणे व आँनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत बुधवार दि. २३ पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे त्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही दुसर्‍या दिवशी गुरुवार रोजी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामध्ये नान्नज २,पाटोदा २,खर्डा १,दिघोळ ३,पिंपरखेड २ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी झाली होती. आँनलाईन अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी तहसील कार्यालयाच्या परिसरात झाली होती. आज सोमवारी १२७ अर्ज दाखल झाले ते पुढील प्रमाणे पिंपरखेड ३६, साकत १२, दिघोळ १२, नान्नज ६, धोंडपारगाव १, घोडेगाव १, कवडगाव १, डोणगाव २, पाटोदा ९, बांधखडक ४, खर्डा ६, आपटी ७, आनंदवाडी ५, गुरेवाडी २ खुरदैठन १, नाहुली ३, तरडगाव ३, चोंडी ८, धामणगाव ८ असे एकूण १२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सोमवार अखेर १३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
३० ग्रामपंचायत मधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही शेवटच्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती तोच पायंडा पाडला जाईल अशी शक्यता असून ते शेवटच्या दिवशी मोजकेच उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध होणार अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Related Posts
1 of 1,301
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: