४९ ग्रामपंचायतसाठी  विक्रमी १३०२ उमेदवारी अर्ज दाखल….

0 15

जामखेड – तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी   विक्रमी अर्ज दाखल झाले असून आता ४९ ग्रामपंचायतसाठी ४१७ जागा आहेत त्यासाठी एकूण १३०२  उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७१९ अर्ज आले आहे .

सारोळा, आपटी, खुरदैठन, पोतेवाडी, वाकी या पाच ग्रामपंचायतसाठी जागेच्या प्रमाणातच अर्ज आल्याने सदर सदस्यांची बिनविरोध निवड होणार आहे याबाबत केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने आँफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली होती पण तरीही उमेदवारांनी आँनलाईनलाच प्राधान्य दिले तसेच सायंकाळची साडेपाचची वेळ दिली त्यामुळे उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणावर दाखल झाले.

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतच्या निवडणूका होत आहे उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर  अर्ज दाखल झाले  गावनिहाय दाखल झालेले उमेदवार अर्ज पुढीलप्रमाणे अरणगाव ५२ ,मोहा ४५, साकत४९ , जवळके २१ , सोनेगाव १७  ,घोडेगाव ३६, बोर्ले २४ , चोंडी ४२, धानोरा ३६ , मोहरी १८, सावरगाव१४, पिंपळगाव आळवा २४, खांडवी २५ , बावी १७ , कवडगाव ३०,डोणगाव ३० ,नाहुली २७ ,पिंपळगाव उंडा १५ , गुरेवाडी १४ , पिंपरखेड५७ , धामणगाव ३१ , दिघोळ ४० , बाळगव्हाण १४ ,आनंदवाडी १६, धोंडपारगाव १४ , लोणी २१, कुसडगाव २८ , तरडगाव २२, सातेफळ १४ , पाटोदा ५० , बांधखडक २४ , नायगाव २३,  तेलंगसी २८ , नान्नज ४५  खर्डा १०१ , पाडळी २२, खुरदैठन ७ , चोभेवाडी १८  ,पोतेवाडी ७, राजेवाडी १०, वाघा २०, आपटी ७, सारोळा ९, वाकी ९, आघी १८, झिक्री १५, देवदैठन ३३ असे एकूण १३०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

 जबरी चोरीतला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी मुद्देमालासह नाशिक येथुन जेरबंद

घोडेगाव येथील ८५ वर्षीय आजी हौसाबाई रासकर यांनी काठी टेकवत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला ती यापूर्वी १९९० साली ग्रामपंचायतला उभी होती त्यावेळी तिचा १५ मतांनी पराभव झाला होता आता याच पराभवाचे उट्टे काढण्याचा मानस तिने व्यक्त केला. सारोळा व आपटी भाजप तर पोतेवाडी व खुरदैठन राष्ट्रवादी तर वाकी संमिश्र असल्याची माहिती मिळाली आहे. पाच ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने गुलाल टाकून एकच जल्लोष कार्यकर्त्यांनी केला.

Related Posts
1 of 1,290

हे पण पाहा –   रेखा जरे हत्याकांड । रेखा जरे यांना न्याय मिळून देण्यासाठी कँडल मार्च

आँनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची किचकट प्रक्रिया व सर्व्हर डाऊन मुळे अर्ज दाखल करण्यास वेळ लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदर परिस्थिती पाहून बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ वाढवली  ती  सायंकाळी साडेपाच पर्यंत केली त्यामुळे आज शेवटच्या दिवशी विक्रमी ७१९ अर्ज दाखल झाले.

राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करावी – राम शिंदे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: