२७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे अयोजन – माजी उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद  

0 21

जामखेड – युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनच्या वतीने दि. २७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय भव्य “हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी उपमहाराष्ट्र केसरी व मल्लविद्या संस्कार फौंडेशनचे विश्वस्त बबनकाका काशीद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात अयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना बबनकाका काशीद म्हणाले, थोर महात्म्यांच्या जयंती निमित्त अयोजीत राज्यस्तरीय हाफ मॅराथॉन स्पर्धेचे
उद्घाटन कर्जत-जामखेडचे युवा आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेसाठी विविध बक्षिसे ठेवली असून यामधे पुरूषांसाठी १५ कि. मी अंतर धावणे करीता प्रथम येणाऱ्यास ११०००, व्दितीय ७०००, तृतीय ५०००, चतुर्थ ३०००, पाचवे २०००, तर महिलांसाठी आठ कि. मी धावणे स्पर्धा असून प्रथम बक्षिस ५०००, व्दितीय ४०००, तृतीय ३०००, चतुर्थ २०००,पाचवे १०००, याशिवाय या सर्व बक्षिस मिळविलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत. या बरोबरच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे असे बबनकाका काशिद यांनी सांगितले.

Related Posts
1 of 1,292

यावेळी बोलताना ते म्हणाले मल्लविद्या संस्कार फौंडेशन तालुक्यात सातत्याने विविध प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा घेऊन जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेईल सध्याच्या तरूणांना असलेले मोबाईलचे व्यसन व व्यसनाधीनता मोडून काढण्यासाठी आमचे फौंडेशन यासाठी प्राधान्य देणार आहे. तरूण तरूणी व वयस्कर व्यक्ती या सर्व क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपले व आपले दैनंदिन जीवनात निर्व्यसनी व तंदुरुस्त शरीर राहतील यासाठी व्यायाम, योगा, खेळ या माध्यमातून प्रयत्न करतील. यापूर्वी आम्ही के. विष्णु वस्ताद यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा अयोजीत दरवर्षी करतो या कुस्तीसाठी राज्य, देश पातळीवरील मल्लांनी हजेरी लावून सहभाग नोंदविला आहे हे जामखेड करांनी पाहिले आहे.

दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता खर्डा रोडवरील शेतकरी मार्केट येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून समारोपही त्याच ठिकाणी होणार आहे.या स्पर्धेची नाव नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने बबनकाका काशिद यांनी केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: