DNA मराठी

२४ तासात राज्यात २२ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त 

0 72

 मुंबई –   राज्यात आज एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने  रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या ३ लाख ८८७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २१,६५६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४०५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२८३ (५२), ठाणे- ४४५ (६), ठाणे मनपा-४३१ (१०), नवी  मुंबई मनपा-२८० (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५७ (१), उल्हासनगर मनपा-७२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३९ (१), मीरा भाईंदर मनपा-२०१ (९), पालघर-२१५ (४), वसई-विरार मनपा-२३५ (१), रायगड-४५२ (९), पनवेल मनपा-२४७, नाशिक-२४१ (१०), नाशिक मनपा-५२३ (५), मालेगाव मनपा-२० (१), अहमदनगर-६९८ (१२),अहमदनगर मनपा-२९७ (९), धुळे-३९ (२), धुळे मनपा-४०(१), जळगाव-८३४ (१३), जळगाव मनपा-१३० (३), नंदूरबार-१३३, पुणे- १३५६ (७), पुणे मनपा-१८७५ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-८१० (४), सोलापूर-५८४ (९), सोलापूर मनपा-५३ (३), सातारा-९०२ (३४), कोल्हापूर-६०७ (५), कोल्हापूर मनपा-१९६ (६), सांगली-७८१ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३३१ (४), सिंधुदूर्ग-२०० (६), रत्नागिरी-११५, औरंगाबाद-११७ (५),औरंगाबाद मनपा-१७९ (७), जालना-७३ (१), हिंगोली-४७ (१), परभणी-३३२, परभणी मनपा-२४ (३), लातूर-२२१ (८), लातूर मनपा-९४ (४), उस्मानाबाद-२९५ (२), बीड-१८२ (७), नांदेड-१९० (१), नांदेड मनपा-१३२ (३), अकोला-३७, अकोला मनपा-८३ (१), अमरावती-१२५ (१), अमरावती मनपा-२४६, यवतमाळ-३२० (१०), बुलढाणा-१०७ (१), वाशिम-१०१ (३), नागपूर-४१२ (५), नागपूर मनपा-१६९४ (५९), वर्धा-१२९, भंडारा-९२, गोंदिया-१६६ (४), चंद्रपूर-१५७, चंद्रपूर मनपा-१०१, गडचिरोली-३८, इतर राज्य- ४० (२).

Related Posts
1 of 2,489

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५१ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७८ हजार ७९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के एवढा आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: