२४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन करोनाबाधित रुग्णांची भर

नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांत देशात ८६ हजार ५०८ नवीन करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील करोना बाधितांची संख्या ५७ लाख ३२ हजार ५१९ इतकी झाली आहे तर २४ तासांत १,१२९ जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा दर १.५९ टक्क्य़ांपर्यंत कमी झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात ९ लाख ६६ हजार ३८२ जणांवर उपचार सुरु आहेत. तर करोना संसर्गातून मुक्त झालेल्यांची संख्या ४६ लाख ७४ हजार ९८८ इतकी झाली आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहे .
गेल्या काही आठवड्यापासून अचानक झालेल्या रुग्णवाढीनं देशातील एकूण रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली असून, ५७ लाखांच्या पुढे गेली आहे. दुसरेकडे करोना मृतांची संख्या लाखाच्या जवळ गेली आहे. गेल्या २४ तासात देशात १,१२९ जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला.
तर राज्यात आज १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आज २१ हजार २९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.